अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हादरली ही धरणी, थरथरले आसमान लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण तळहातावर आला घेऊनी पंचप्राण सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका तिथे रामनामाचा तू वाजविला डंका दैत्य खवळले सारे, परि हसले बिभिषण हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान
Anjanichya Suta Tula Ramach vardan / अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
Anjanichya Suta Tula Ramach vardan / अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
,
Marathi movie songs
,
Movie
Edit
0 comments:
Post a Comment