एक लाजरा न्‌ साजरा

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला ग
राजा मदन हसतोय कसा कि जीव माझा भुलला ग
ह्या एकांताचा तुला इशारा कळला ग
लाज आडवी येती मला कि जिव माझा भुलला ग
नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू
हितं नको तितं जाऊ, आडोशाला उबं र्‍हाऊ
का ? ............ बघत्यात !

रेशिम विळखा घालुन सजना नका हो कवळुन धरू
लुकलुक डोळं करुन भोळं बगतंय फुलपाखरू
कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला ग

डोळं रोखुन थोडं वाकुन झुकू नका हो फुडं
गटर्गुम गटर्गुम करून कबूतर बघतंय माज्याकडं
लई दिसानं सखे आज ह्यो धागा जुळला ग

बेजार झाले सोडा सजणा शिर्शिरी आली अंगा
मधाचा ठेवा लुटता लुटता बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला ग ?
Share on Google Plus

About MiuiOS.in

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment