उगवली शुक्राची चांदणी

अडवू नका मज सोडा आता, पुरं झालं ना धनी
उगवली शुक्राची चांदणी !

( हिचं ऐका पाव्हणं, काय हे वागणं शोभतंय्‌ व्हय्‌ तुम्हाला ?
हिचा हात धरून, गालामध्ये हसणं शोभतंय्‌ का तुम्हाला ?
जरा लाज धरा हो येता-जाता पाहिल्‌ ना हो कुणी ! )

उगवली शुक्राची चांदणी !

निरव शांतता अवतीभवती, रातकिडं हे किरकिर करती
भिरभिर उडती वर पाकोळ्या धडधड होते मनी
उगवली शुक्राची चांदणी !

लवलव करिती हिरवी पाती, चमचमणार्‍या चांदणराती
वार्‍यावरती गंध दरवळे केतकीच्या या बनी
उगवली शुक्राची चांदणी !
Share on Google Plus

About MiuiOS.in

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment