Shri Ramchandranchi aarati ( utkat sadhuni shila setu bandhoni )

Shri Ramchandranchi aarati ( utkat sadhuni shila setu bandhoni )


श्री  रामचंद्रांची  आरती 



उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।

लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।

कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।

देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।।

जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ।।

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।

लंका दहन करुनी अखया मारिला ।

मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला ।

आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। २ ।।

निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।

म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।

आनंदे ओसंडे वैराग्य भरता ।

आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ३ ।।

अनाहतध्वनि गर्जती अपार ।

अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।

अयोध्येसी आले दशरथकुमार ।

नगरीं होत आहे आनंद थोर ।। ४ ।।

सहजसिंहासनी राजा रघुवीर ।

सोऽहंभावे तया पूजा उपचार ।

सहजांची आरती वाद्यांचा गजर ।

माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ५ ।।
Share on Google Plus

About MiuiOS.in

This is a short description in the author block about the author. You edit it by entering text in the "Biographical Info" field in the user admin panel.
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment