झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया मामाचा गाव मोठा, सोन्याचांदीच्या पेठा शोभा पाहून येऊया, मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको घोरटी, म्हणेल कुठली पोरटी भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको सुगरणं, रोज रोज पोळी शिकरणं गुलाबजामुन खाऊया, मामाच्या गावाला जाऊया मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल हजार वार कोट विजारी घेऊया, मामाच्या गावाला जाऊया
Home
balgeete
Zuk zuk zuk zuk agingaadi / झुकझुक झुकझुक अगिनगाडी
Zuk zuk zuk zuk agingaadi / झुकझुक झुकझुक अगिनगाडी
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment